अमरावती : BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेचे लोण महाराष्ट्रात पसल्याचे दिसून येत आहे. नाशिक मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत पडसाद उम...
अमरावती : BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेचे लोण महाराष्ट्रात पसल्याचे दिसून येत आहे. नाशिक मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत पडसाद उमटलेत. आज अमरावतीत बंद दरम्यान काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्यात आली होती. भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले होते. या बंदला हिंसक वळण लागले. मात्र, भाजपने महाविका आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. (Maha Vikas Alliance government responsible for Amravati violence - BJP)
अमरावती हिंसाचारासाठी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहे. तपास यंत्रणा काय करत होत्या, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तर अमरावतीतील हिंसाचारावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील मोर्चे हे सुनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. तर या प्रकरणी सरकारने कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
COMMENTS